Breaking News

प्रभागातील मंदिरांसमोर सभामंडप उभारणार : महापौर

अहमदनगर/प्रतिनिधी
“शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व पक्षांच्या नगरसेवकांना बरोबर घेऊन काम करत आहोत. विकासकामे करण्याबरोबरच समाजात धार्मिकता वाढावी यासाठी प्रभागातील सर्वच मंदिरांसमोर सभामंडपांची उभारणी करणार आहे’’, असे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 6 मधील रुपमाता कॉलनी परिसरातील रस्ता काँक्रिटीकरण, ड्रेनेजलाईन, ओपन स्पेस सुशोभिकरण आदी कामांचा शुभारंभ महापौर वाकळे यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमास नगरसेवक रवींद्र बारस्कर, राहुल वाकळे, गुलाबराव वाकळे, मनोज ताठे, गणेश वाकळे, जगन्नाथ कदम, दशरथ गुंड, नितीन भिसे, संजय काळे, अशोक दळवी, किशोर बारस्कर, प्रसाद डोईफोडे, वंदना सरवदे, रेखा गुंड, प्रिया पवार, मंदाकिनी जाधव, अक्षय सरवदे, सागर मकासरे, भूषण कडूस, अभिजित कांबळे, महेश जाधव, अजय पवार, सार्थक गांगर्डे, संजय निर्मल आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना महापौर वाकळे म्हणाले, “शहरात विकासकामे करताना यामध्ये नागरिकांना सहभागी करुन घेतले जात आहे. त्यांच्याशी चर्चा करुनच विकासकामांचे नियोजन केले जात आहे. शहराचा पुढील 50 वर्षांचा विकास आराखडा तयार केला जाणार आहे. महापालिकेच्या माध्यमातून शहरात आता विकासकामे झालेली दिसतील. यासाठी शासनाकडून मोठा निधी उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. केंंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असल्याने शहर विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे. प्रभाग क्रमांक 5 व 6 मध्ये प्रत्येकी 10 कोटी रुपयांची विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत. लवकरच या कामांना सुरुवात होणार आहे’’, असे त्यांनी सांगितले.