Breaking News

विसर्जनानंतर चौपाट्यांची स्थिती अत्यंत वाईट ; अभिनेत्री सोनाली बेंद्रेनं व्यक्त केली चिंता

मुंबई 
 दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहाने आपण गणपती बाप्पाचे स्वागत केले . जेव्हा बाप्पाच्या विसर्जनाची वेळ होते तेव्हा सर्वे भावुक होतो. मात्र दुसरीकडे विसर्जनाच्या दुसर्‍या दिवशी चौपाट्यांची स्थिती अत्यंत वाईट असते. चौपाटीचा एक फोटो ट्विटरवर शेअर करत अभिनेत्री सोनाली बेंद्रेने चिंता व्यक्त केली आहे.
कालच्या विसर्जनानंतर आपण केलेल्या नुकसानीचे जर हे चित्र नसेल तर मला माहीत नाही की याहून वेगळं काय असेल. हे होता कामा नये. ही परिस्थिती आपण बदलली पाहिजे, असं लिहित सोनालीने नागरिकांना आवाहन केलं आहे. सोनालीने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये निर्माल्य, प्लास्टिक, मूर्तींचे अवशेष समुद्रकिनारी जमा झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान गणेशोत्सवात लोकांमधील आनंद ओसंडून वाहत असतो. पण गणेश विसर्जनानंतर त्याचा समुद्रकिनार्‍यांवर कचर्‍याचे साम्राज्य पाहायला मिळते. यावर अद्यापही जनजागृती होणे गरजेचे आहे .