Breaking News

गणेश मंडपात दारू पिऊन धिंगाणा

सुरत
गणपती आगमनाच्या मिरवणुकीत बीअरच्या बाटल्या हातात घेऊन डान्स करणार्‍या मंडळाच्या कार्यकर्त्यांचा व्हिडिओ ‘सोशल मीडिया’वर व्हायरल झाला आहे. दारूबंदी असलेल्या गुजरातमधील हा व्हिडिओ आहे. पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे. गोलवाड परिसरात रविवारी रात्री गणेश मंडपात मूर्ती आणली जात होती. त्या वेळी काही जण बीअरच्या बाटल्या हातात घेऊन नाच करीत होते. दारूबंदी असलेल्या गुजरातमध्येच कायदा धाब्यावर बसवल्याचे स्पष्ट झाले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली. ’व्हिडिओची तपासणी करून दारूच्या नशेत धिंगाणा घालणार्‍या तरुणांची ओळख पटवण्यात येत आहे. तसेच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे,’ असे सुरत पोलिसांनी सांगितले.