Breaking News

घरकूल घोटाळ्यातील वकील बदलण्याची कारवाई संशयास्पद

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे मुख्यमत्र्यांना पत्र

Anna Hazare
पारनेर/प्रतिनिधी
 जळगाव घरकूल घोटाळ्यातील 48 आरोपींना धुळे सत्र न्यायालयाने दोषी ठरवून कठोर शिक्षा फर्मावल्यानंतर राज्य सरकारने सदर खटल्यातील विशेष सरकारी वकील बदलले आहेत.
ही वकील बदलण्याची कारवाई संशयास्पद असल्याचे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे.
 या घोटाळ्याबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 2003 मध्ये आंदोलन केले होते. सदर खटल्यात सुरुवातीपासून वकील प्रवीण चव्हाण यांनी अत्यंत अभ्यासपूर्वक काम पाहिलेले आहे. आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचवले आहे. असे असताना चव्हाण यांना पुढील कामकाजात विशेष सरकारी वकील म्हणून ठेवण्याऐवजी याच खटल्यातील काही आरोपींशी पुर्वीचे संबंध असलेले वकील विजय सावंत यांची मुख्य विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चव्हाण यांना सावंत यांचे सहाय्यक म्हणून नियुक्त केले आहे. सदर निर्णय अयोग्य असून व संशयास्पद असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे.
  वकील बदलला जाणार आहे. ही बाब समजताच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे रुग्णालयात उपचार घेत होते. तरीही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तात्काळ फोन करून या प्रकरणात वकील बदलण्याविषयी नाराजी व्यक्त केली होती. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी असे काही होणार नाही असे आश्‍वासनही दिले होते. तरीही शासनाकडून सावंत यांची नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश निघाले. त्यावर रविवारी अण्णांनी मुख्यमंत्र्यांना सावंत यांची नियुक्ती न करता प्रविण चव्हाण यांच्याकडेच या खटल्याचे कामकाज ठेवावे, अशी परखड मागणी केली. त्यानंतर सरकारकडून योग्य निर्णय होईल अशी वाट पाहिली. परंतु अद्याप शासनाने त्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही.