Breaking News

कृषी विद्यापीठाच्या बेकरी युनिटचे उदघाटन

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी

 महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे बेकरी युनिटच्या नविन यंत्रे व मशिनरीचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.के.पी. विश्वनाथा यांच्या हस्ते झाले. या बेकरी युनिटमध्ये पौष्टिक, स्वच्छ, गुणात्मक आणि मानवी आरोग्यास पोषक तत्वांनी युक्त व अतिशय माफक दरात साधा ब्रेड, मिल्क ब्रेड, मिल्क स्वीट टोस्ट, स्वीट बनपाव, सुरती बटर, नानकटाई, नाचणी बिस्कीट आदी उत्पादने तयार केलीजाणार आहेत.

  यावेळी कुलगुरु म्हणाले की या बेकरी युनिटमध्ये आपण विविध प्रकारचे पौष्टिक पदार्थ निर्माण करण्याचे प्रशिक्षण तरुण पिढीला, महिला वर्गास, बचत गटांना देऊन त्यांचे आर्थिक बळकटीकरण करावे. तरुणांनी या व्यवसायाकडे वळून समाजाला चांगल्या खाद्य पदार्थांचा पुरवठा करावा.