Breaking News

मुस्लिम मदारी वस्तीमध्ये विकासकामास प्रारंभ फोटो

जामखेड/ता. प्रतिनिधी

 जामखेड तालुक्यातील खर्डा येथील मुस्लिम मदारी वस्ती मध्ये फरशी बसवण्याचा प्रारंभ जेष्ठ नागरिक सुरेश सूळ व सरदार मदारी यांच्या हस्ते करण्यात आला. गेल्या महिन्यात येथील नागरिकांनी रोहित पवार यांच्याकडे निवेदन देऊन लक्ष वेधले होते. या बाबत त्यांनी स्थानिक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा करून सध्या फरशी बसवून नंतर वॉलकंपाउंड बांधून देण्याचे आश्वासन दिले. समाजाच्या वतीने रोहित पवार यांचे आभार मानण्यात आले.

  या वेळी राष्ट्रवादीचे नितीन गोलेकर, विजयसिंह गोलेकर, पत्रकार दत्तराज पवार, सचिन लोळगे, ज्योती गोलेकर, शिवकन्या इंगळे, चंद्रकांत गोलेकर, श्रीकांत लोखंडे, विलास जाधव, सलमान आतार, महेबूब मदारी, फतू मदारी, हुसेन मदारी, फकीर मदारी व बारामती ऍग्रोचे बोराटे आदींसह मदारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.