Breaking News

पारनेरची दुष्काळी ओळख पुसणे हे माझे कर्तव्य : झावरे

पारनेर/प्रतिनिधी
 राज्यातील पहिला मिनी नदीजोड प्रकल्प यशस्वी करुन दाखवला. आज इतर गोष्टीकडे दुर्लक्ष करुन पाण्या संदर्भातच काम करणे गरजेचे आहे. विकासकामे करण्यासाठी आवश्यक असलेली सत्ता जनतेने दिल्यास पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यास प्रयत्न करु. पारनेरची दुष्काळी ओळख पुसणे हे माझे कर्तव्य आहे. असे प्रतिपादन जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी केले आहे.
  खडकवाडी येथे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मंजूर लेंडी ओढा बंधार्‍याचे भूमिपूजन जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. तसेच प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजने अंतर्गत आदिवासी तसेच गरीब लाभार्थीना गॅस कनेक्शनचेही वाटप करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सदर बंधार्‍यासाठी सन 2019-20 या आर्थिक वर्षांमध्ये 15 लाखांचा निधी मंजूर करण्यात आले आहे.
 यावेळी सुजित झावरे म्हणाले की, पारनेर तालुक्यात स्व.दादांच्या काळात काळू प्रकल्प, भांडगाव प्रकल्प, शिवडोह, पिंपळगाव जोगे, कॅनोल, मांडओहोळ चारीचे अस्तरीकरण, यासह पाणी आडविण्याच्या दृष्टीने अनेक महत्वपुर्ण प्रकल्प, तसेच जिल्हा परिषद उपाध्यक्ष काळामध्ये 40 कोटीपेक्षा जास्त पिण्याच्या पाण्याचा योजना यशस्वीपणे राबविल्या. याच बरोबर आज माझ्याकडे सत्ता नसताना देखील अनेक पाणी योजना राबविल्या. सत्ता आल्यावर तालुक्यातील पाणी योजनेमध्ये निश्‍चितच भर पडेल.
 यावेळी अरुणराव ठाणगे, बाबासाहेब खिलारी, अमोल साळवे, शरद गोरे, रावसाहेब गागरे, किसन वाळुंज, मिठू जाधव, रंगनाथ गुंजाळ, तुळशिराम शेलार, निजाम पटेल, मन्सूर पटेल, संजय काशीद, दिनकर जाधव, प्रसाद झावरे, कैलास नर्‍हे, सचिन साठे, मोहन रोकडे, काशिनाथ गागरे गुरुजी, यादवराव गागरे, सुभाष ढोकळे, बबन ढोकळे, मारुती आग्रे, विश्‍वनाथ ढोकळे, सरपंच चिमाजी चिकणे उपस्थित होते.