Breaking News

परदेशी विद्यार्थिनीचा प्राध्यापकावर विनयभंगाचा आरोप

Kanpur Intitute of Technology
कानपूर
इंडिअन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) कानपूर येथे शिकणार्‍या एका परदेशी विद्यार्थिनीने इथल्या एका प्राध्यापकावर विनयभंगाचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या विद्यार्थिनीने याची तक्रार थेट तिच्या देशाच्या भारतातल्या दूतावासाकडे केली आहे. दूतावासाने ही तक्रार आयआयटी प्रशासनाकडे वर्ग केली असून चौकशी सुरू करण्यात आली आहे. पीडित विद्यार्थिनी या संस्थेत इतर देशांच्या स्टुडंट एक्स्चेंज प्रोग्राम अंतर्गत शिकण्यासाठी आली आहे.