Breaking News

दीनदयाळ व्याख्यानमालेने नगरकरांची भागते भूक ः वसंत लोढा

अहमदनगर/प्रतिनिधी
“ पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून सुरु केलेल्या व्याख्यानमालेच्या माध्यमातून देशातील नावाजलेले वक्ते विचार मांडत असून नगरकरांची वैचारिक भूक भागत आहे. व्याख्यानमालेच्या चौथ्या वर्षी देशातील प्रख्यात विचारवंत वक्त्यांची उपस्थिती राहणार आहे. ही व्याख्यानमाला उत्तरोत्तर अशीच यशस्वी होऊन बहरत राहो, यासाठी विशाल गणपती चरणी साकडे घातले आहे’’, असे प्रतिपादन पं. दीनदयाळ पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन वसंत लोढा यांनी केले.
पं.दीनदयाळ पतसंस्थेच्या व्याख्यानमालेस 3 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. या निमित्त  प्रचार व प्रसिद्धीपत्रकाचे अनावरण विशाल गणपती मंदिरात होऊन गणपतीचरणी पत्रक अर्पण करण्यात आले. यावेळी पतसंस्थेचे सचिव विकास पाथरकर, संयोजन समितीप्रमुख धनंजय तागडे, कार्यवाह सुहास मुळे, गणपती मंदिराचे सचिव अशोक कानडे, नीलेश लोढा, कैलास दळवी, अशोक बकोरे, उमेश बोरा, बाळासाहेब भुजबळ आदी उपस्थित होते.
विकास पाथरकर म्हणाले, पंडित दीनदयाळ संयोजन समिती व्याख्यानमालेचे उत्कृष्ट नियोजन करत आहे. समाजातील ज्वलंत विषय व्याख्यानमालेतून मांडले जात आहेत. यावर्षीही काश्मीर विषयावर इंद्रेशकुमार विचार मांडणार आहेत. पुरोगामी विषयावर ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर बोलणार असून, भारताच्या आधुनिक वाटचालीबाबत भाजपाचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर विचार मांडणार आहेत. व्याख्यानमालेच्या तीनही दिवशी विविध क्षेत्रातील मान्यवरांना पचारण करण्यात आले आहे. श्रोत्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.