Breaking News

भुजबळांना शिवसेनेत प्रवेश नाही: राऊत

नाशिक / प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना शिवसेनेत प्रवेश देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. 
येवला येथे ते बोलत होते. या वेळी त्यांनी खासदार नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवरही मत मांडले. राणे यांना भाजपमध्ये प्रवेश द्यावा किंवा नाही हा त्यांचा विषय आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाला आमचा विरोध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. येवला मतदारसंघातील शिवसेना नेते आणि पदाधिकार्‍यांनी राऊत यांची भेट घेतली. भुजबळ यांना पक्षात प्रवेश देऊ नये, अशी मागणी त्यांनी राऊत यांच्याकडे केली. त्यावर भुजबळ यांना शिवसेनेत घेणार नाही, असे आश्‍वासन राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिले. मी आहे तिथे बरा आहे, असे भुजबळांनी काल सांगितल्याने त्यांच्या प्रवेशाबाबतचे चित्र स्पष्ट झाले आहे, असेही ते म्हणाले.