Breaking News

गोपाळ समाजहित महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी गव्हाणे

नेवासे/प्रतिनिधी
 गोपाळ समाजहित महासंघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या नेवासे तालुकाध्यक्षपदी तालुक्यातील म्हसले येथील आसाराम शिवाजी गव्हाणे यांची नियुक्ती करण्यात आली.

 गोपाळ समाजहित महासंघाचे राज्य प्रदेशाध्यक्ष रविभाऊ गव्हाणे व राज्य उपाध्यक्ष सुभाष गव्हाणे यांनी त्यांना म्हसले येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान केले. यावेळी महासंघाचे रविभाऊ गव्हाणे, पाथर्डी तालुकाध्यक्ष दिलीप कुऱ्हे, पुणे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब चौघुले यांच्यासह आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.