Breaking News

मादाम तुसाद संग्रहालयातील श्रीदेवीचा पुतळा बघून मुली भावूक

सिंगापूर 
सिंगापूर येथाल मादाम तुसाद संग्रहालयात दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी बोनी कपूर, जान्हवी आणि खूशी भावूक झाले होते. अभिनेत्री श्रीदेवीचा स्मृतिदिन नुकताच पार पडला. सिंगापूरच्या मादाम तुसाद म्युझियममध्ये तिचा मेणाचा पुतळा तयार करून ठेवणार असल्याचं म्युझियमच्या वतीने ठरवण्यात आले होते. 
श्रीदेवीच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरणत्यानुसार नुकताच या पुतळ्याचे श्रीदेवीच्या मुली जान्हवी आणि खूशी यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आलं. श्रीदेवीच्या गाजलेल्या ’हवाहवाई लूक’ मधील हा पुतळा आहे. यावेळी आईचा पुतळा पाहून जान्हवी आणि खूशी दोघी भावुक झाल्या. तर श्रीदेवीचे पती बोनी कपूर हेदेखील तिच्या आठवणीत हरवले.डीळवर्शींळ ीींर्रीींशश्रीदेवीच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरणयाशिवाय म्युझियमच्या वतीने श्रीदेवी यांच्या जगभरातील फॅन्सच्या तिच्याबद्दलच्या भावना एकत्रित करून त्याचा एक भव्य कोलाज तयार केला आहे. श्रीदेवीच्या स्मृतीने काही काळ या म्युझियम मधील वातावरण पुरते भारावून गेले. श्रीदेवी यांचा मेणाचा पुतळा सिंगापूर येथे ठेवण्यात आला असून ते सिनेरसिक तसेच पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये जवळपास 300 चित्रपटात काम करून पाच दशक रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणार्‍या श्रीदेवी यांचा 2018 साली दुबई येथे दुर्दुवी मृत्यू झाला. यावर्षी र्श्रीदेवी यांच्या जन्मदिनी त्यांच्या सन्मानार्थ मॅडम तुसाद येथे पुतळा उभा करण्याची घोषणा करण्यात आली होती.