Breaking News

शाह, मुंडे कलम 370 चा महाराष्ट्रातील निवडणुकीशी संबंध काय? : सामान्यांचा सवाल

बीड
सावरगावमध्ये दरवर्षी प्रमाणे यंदाही पंकजा मुंडे यांनी दसर्‍यानिमित्त मेळावा घेतला. या मेळाव्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाहही उपस्थित होते. या मेळाव्यात पंकजा मुंडे आणि अमित शाह यांच्या भाषणामध्ये शेतकरी आत्महत्या, पाणी प्रश्‍न यासारख्या स्थानिक मुद्द्यांऐवजी देशभक्ती आणि कलम 370 च्या मुद्द्यांवर भर दिला. अनेकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली असून महाराष्ट्रातील निवडणुकीचा काश्मीर आणि कलम 370 शी काय संबंध असा सवाल ट्विटवर उपस्थित केला जात आहे.
अमित शाह यांनी आपल्या भाषणामध्ये, ‘पंतप्रधान मोदींना पूर्ण बहुमत दिल्यानंतर पाच महिन्यांमध्ये सरकारने कलम 370 रद्द केले. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे हे तुम्हाला मान्य आहे की नाही. कलम 370 रद्द करण्याला विरोध करणार्‍यांना तुम्ही निवडून देणार का?’ असा सवाल उपस्थितांना आपल्या भाषणामधून केला. तर दुसरीकडे पंकजा यांनाही आपल्या भाषणातून राष्ट्रभक्ती या विषयावर जोर दिल्याचे पहायला मिळाले. ‘आपल्या देशात राष्ट्रभक्तीचं केवळ सर्वांना एकत्र बांधू शकते. कलम 370 च्या माध्यमातून राष्ट्रभक्ती दिसून आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी कलम 370 हटवून न्याय मिळवून दिला. अमित शाह यांच्या नेतृत्वात सीमोल्लंघन करायचं आहे. सामान्यांसाठी वंचितांसाठी गोपीनाथ मुंडे यांनी जी लढाई दिली ते काम  आता सुरू झालं आहे. उमेदवारी अर्ज भरताना मी पंतप्रधान मोदींचा आशीर्वाद घेतला. तेव्हा ते मला खुश राहा म्हणाले.