Breaking News

5 जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा

कोल्हापूर
पश्‍चिम महाराष्ट्र, मुंबई आणि कोकणात जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. बुधवारी मुंबई पावसाच्या सरी कोसळल्या तर, कोकणातही तुरळक पाऊस कोसळला होता. कोल्हापूरसह सातारा, सांगली, सोलापूर, पुणे 5 जिल्ह्यांमध्ये आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 2 दिवसांत साधारण 60 ते 120 मिमी  पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तामिळनाडूपासून चक्रीय वारे सक्रिय झाल्यानं मान्सून परतीचा पाऊस लांबण्याची चिन्हं आहेत.

यंदा मान्सून उशिरा दाखल झाला असल्यामुळे परतीच्या पावसालाही उशिर होत आहे. ऑक्टोबरच्या तिसर्‍या आठवड्यामध्ये परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांमध्ये कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये तुरळक प्रमाणात पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

परतीच्या पावसाला सुरुवात होण्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस होणार असल्याचंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. यंदा मान्सून उशिरा दाखल झाला असल्यामुळे परतीच्या पावसालाही उशिर होत आहे. ऑक्टोबरच्या तिसर्‍या आठवड्यामध्ये परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांमध्ये कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये तुरळक प्रमाणात पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

नगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत काही भागात 12 ऑक्टोबरपर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. लातूर, बीड, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यांसह उर्वरित मराठवाड्यात हवामानाची ही स्थिती 11 ऑक्टोबरपर्यंत राहील, तर विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील काही भागात 12 ऑक्टोबरपर्यंत काही प्रमाणात ढगाळ हवामान आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बुधवारी संध्याकाळी पुण्यात सोसाट्याच्या वार्‍यासह आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. जोरदार वार्‍यानं झाडं पडल्याच्या घटनाही घडल्या. यात किमान तीन जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. राज ठाकरे यांची पुण्यातली पहिलीच सभा या पावसामुळे रद्द करण्यात आली. स्कायमेट या हवामानाचा अंदाज वर्तवणार्‍या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार मुंबई, ठाणे, पुणे, नगर, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत काही भागात 13 ऑक्टोबरपर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

पुण्यात झालेल्या पावसाचा फटका राज ठाकरेंनाही बसल्याचं पाहायला मिळालं. बुधवारी राज ठाकरेंची पहिली प्रचारसभा पावसामुळं रद्द करण्यात आली होती. बुधवारी संध्याकाळी जोरदार पाऊस झाल्यामुळं सभेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. त्यामुळं अखेर ही सभा रद्द करावी लागली. निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये पावसाचा राजकीय नेत्यांच्या सभांना कसा फटका बसणार आहे हे पाहाणंही महत्त्वाचं ठरणार आहे.