Breaking News

पाकिस्तान प्रशासित काश्मीरमध्ये ‘आझादी’साठी मोर्चा

मुजफ्फराबाद
पाकिस्तान प्रशासित काश्मीरची राजधानी मुजफ्फराबादहून निघालेला ’आझादी मोर्चा’ प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या जवळ पोहोचला आहे. पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेपासून सहा किलोमीटर अंतरावरच या मोर्चाला रोखलं आहे.
भारताने दोन महिन्यांपूर्वी जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करून भारत प्रशासित काश्मीरमध्ये कडक निर्बंध लावले आहेत. त्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला आहे.
मोर्चात सहभागी झालेले लोक रात्रभर रस्त्यावरच ठाण मांडून बसले होते. आणि सकाळी पुन्हा सीमेच्या दिशेने कूच करणार, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, पाकिस्तान प्रशासित काश्मीरचं सरकार आणि मोर्चेकर्‍यांमध्ये चर्चाही झाली. पण त्यातून काहीही निष्पन्न होऊ शकलं नाही.
जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा मोर्चा तीन दिवसांपूर्वी मुजफ्फराबादमधून सुरू झाला होता. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी लोकांना ङजउ न ओलांडण्याचं आवाहन केलं आहे.
भारताविरुद्ध घोषणाबाजी करत सीमेच्या दिशेने आलेल्या हजारो लोकांपैकी एक असलेल्या शमा तारिक खान पेशाने वकील आहेत. त्या सांगतात, ही ङजउ नाही. ही एक रक्ताळलेली भेग आहे, ज्याला ङजउ नाव देण्यात आलं आहे. ही रेषा मिटवून पलीकडे जावं, असं आम्हाला वाटतं. हे आमचं घर आहे. आम्हाला आमच्याच घरातल्या एका खोलीतून दुसर्‍या खोलीत जायचं आहे. आम्हाला का थांबवता? आम्ही आमच्या घरी, काश्मीरला चाललो आहोत.
जेकेएलएफईआर संबंधित कार्यकर्ते शाहबाज काश्मिरी सांगतात, आम्ही सीमारेषा मिटवण्यासाठी चाललो आहोत. जगातल्या इतर नागरिकांनीही आपल्या घराबाहेर पडावं आणि आम्हाला पाठिंबा द्यावा, असा संदेश आम्हाला द्यायचा आहे. अल्लाहच्या मनात असेल तर ही सीमारेषा मिटेल.
मोर्चाचं उद्दीष्ट स्पष्ट करताना एक आंदोलनकर्ता दानिश सानिया यांनी सांगितलं, आम्हाला भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांपासून स्वातंत्र्य हवं आहे. आमची भूमी 22 ऑक्टोबर 1947 ला ताब्यात घेण्यात आली. आम्ही आमच्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी इथं आलो आहोत.
आमची जमीन कुणीही खरेदी करू नये, यासाठी खास आमचं वैशिष्ट्य असलेलं कलम 35- रद्द करण्यात आलं. जी जमीन आमच्या पूर्वजांनी सात हजार वर्षं सांभाळून ठेवली. ती आम्हाला वाचवायची आहे. आमच्या काश्मिरीयतमध्ये कोणताच हस्तक्षेप आम्ही खपवून घेणार नाही, सानिया सांगतात.

पाकिस्तानी सैन्याने रोखला मोर्चा
आझादी मोर्चाला पाकिस्तानी सरकारने चिकोटी तपासणी नाक्यापासून सहा किलोमीटरवर चिनारीजवळ रोखलं आहे. मोर्चाला रोखण्यासाठी रस्त्यावर मोठमोठाले कंटेनर टाकून रस्ता अडवण्यात आला आहे. तसंच काटेरी तारा पसरवण्यात आल्या आहेत. प्रशासनाने रोखल्यानंतर मोर्चेकरी श्रीनगर आणि उरीकडे जाणार्‍या रस्त्यांवरच ठाण मांडून बसले आहेत. यादरम्यान मोर्चेकर्‍यांच्या नेत्यांनी प्रशासनाशीही चर्चा केली. पण यातून कसलाही तोडगा निघू शकला नाही.