Breaking News

इकडे मोदी-जिनपिंग यांची भेट, तिकडे पाकिस्तान करणार मिसाईल परीक्षण

नवी दिल्ली
चीनी राष्ट्रपती शी जिनपिंग (दळ गळपळिपस) दोन दिवसाच्या भारत दौर्‍यावर आहेत. आज शी जिनपिंग आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (छरीशपवीर चेवळ) यांची महाबलीपुरममध्ये (चरहरलरश्रर्ळिीीरा) भेट होणार आहे. याच दरम्यान पाकिस्तान पुन्हा एक मोठं पाऊल उलचणार असल्याची गुप्त माहिती भारताच्या हाती लागलीय. आज नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग ज्या वेळी भेटणार आहेत त्याच वेळी पाकिस्तान एक मिसाईल परिक्षण करणार आहे. कराची पोर्टजवळ हे मिसाईल परिक्षण होणार असल्याचं समजतंय.

गुप्तचर यंत्रणेनं दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान हे परिक्षण सोनमियानी परीक्षण रेंजमध्ये करणार आहे. पाकिस्तानचं दक्षिणी बंदर आणि शहर कराची इथून हा भाग जवळपास उत्तर-पश्‍चिम दिशेला 40 किलोमीटर अंतरावर आहे.

यापूर्वी गेल्या ऑगस्ट महिन्यात पाकिस्ताननं जमिनीवरून जमिनीवर हल्ला करू शकणार्‍या बॅलेस्टिक मिसाईल - गजनवीचं यशस्वी परीक्षण केलं होतं. इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (खडझठ) द्वारे याबद्दल माहिती दिली होती. खडझठ चे महासंचालक मेजर जनरल आसिफ गफूर यांनी सोशल मीडियाद्वारे याची माहिती दिली होती. ही मिसाईल 290 किलोमीटरपर्यंत अनेक प्रकारचे हत्यारं वाहून नेण्यासाठी सक्षम आहे.

याअगोदर पाकिस्तानी सेना जमिनीवरून जमिनीवर हल्ला करू शकणार्‍या बॅलेस्टिक मिसाईल - शाहीन 2 चं परीक्षण करण्यात यशस्वी ठरली होती. मे महिन्यात हे परीक्षण पार पडलं होतं.