Breaking News

स्ट्राँगरूम आणि मतमोजणी केंद्राभोवती जॅमर बसवा,: धनंजय मुंडें

Dhananjay Mundhe
बीड
विधानसभा निवडणूकीच्या मतपेट्या ठेवलेल्या स्ट्राँगरूम आणि मतमोजणी केंद्राभोवती जॅमर बसवावा तसेच मतदान ते मतमोजणी प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत या परिसरातील मोबाईल टॉवरही बंद ठेवावेत अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
मागील काही निवडणूकांपासून देशात ईव्हीएम मशीन हॅक होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्या पार्श्‍वभूमीवर धनंजय मुंडे यांनी ही मागणी केली आहे. मतदानासाठी वापरण्यात येणार्या मतदान यंत्राशी मोबाईल टॉवर्स आणि वायफायच्या माध्यमातून छेडछाड होण्याची भीती असून निवडणूक प्रक्रीयेतून निष्पक्षता कायम रहावी या दृष्टीने आयोगाने सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
विधानसभा निवडणूकीच्या मतपेट्या ठेवलेल्या स्ट्राँगरूम व मतमोजणी केंद्राभोवती जॅमर बसवावा तसेच मतदान ते मतमोजणी पूर्ण होईपर्यंत परिसरातील मोबाईल टॉवरही बंद ठेवावे अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली. निवडणूक प्रक्रीयेत निष्पक्षता रहावी यासाठी आयोगाने सुरक्षात्मक उपाययोजना करावी.
मागील निवडणुकांच्या काळात देशातील एतच् हॅकींगबाबत लोकांमध्ये साशंकता आहे. मतदानासाठी वापरण्यात येणार्या मतदान यंत्राशी मोबाईल टॉवर्स, वायफायच्या माध्यमातून छेडछाड होण्याची भिती लोकांच्या मनात आहे. निवडणुक आयोगाने खबरदारी घ्यावी. लोकशाहीची पाळेमुळे मजबूत असावी हाच आमचा उद्देश.
सुरक्षेचा उपाय म्हणून मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये व मतमोजणीसाठी निश्‍चित करण्यात आलेल्या मतमोजणी केंद्रात जॅमर बसवण्यात यावेत, तसेच या दोन्ही जागांच्या परिसरातील मोबाईल टॉवर यंत्रणा 21 ऑक्टोबर 2019 ते 24 ऑक्टोबर 2019 पर्यंत बंद करण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी, परळी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे ई-मेलद्वारे केली आहे.