Breaking News

‘युती’ला धडा शिकविण्यासाठी राष्ट्रवादीची छुपी ’मनसे’ खेळी

मुंबई । अजित मांढरे 07 ऑक्टोंबर
विधानसभेच्या निवडणुका मनसे स्वतंत्रपणे लढवत असली तरी काँग्रेस-राष्ट्रवादीचा मनसेला पूर्ण पाठिंबा असल्याचं स्पष्ट झालंय. मतविभाजन टाळण्यासाठी राष्ट्रवादीने अनेक काही ठिकाणी आपल्या उमेदवारांना माघार घ्यायला लावली तर काही ठिकाणी त्यांनी उमेदवारच उभे केले नाहीत. ठाणे शहर आणि कल्याण ग्रामीण या महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीने उमेदवार मागे घेतल्याने आता मनसे विरुद्ध भाजप किंवा शिवसेना असा थेट सामना रंगणार आहे. राष्ट्रवादी आणि मनसेची ही खेळी आता किती रंगत आणणार हे निवडणुकीत दिसणार आहे. ठाणे शहर मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार संजय केळकर यांनाच भाजपने तिकीट दिलं.