Breaking News

अभिनेत्रीला बॉयफ्रेंडनं ठेवलं बाथरुमध्ये कोंडून

मुंबई/प्रतिनिधी
टीव्हीवरील सर्वाधिक वादग्रस्त शो ’बिग बॉस 13’ सध्या खूप चर्चेत आहे. या शोमध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळे वाद आणि भांडणं पाहायला मिळत आहेत. तर काही स्पर्धक त्यांच्या आयुष्यातील अनुभव एकमेकांशी शेअर करताना दिसत आहेत. त्यामुळे सध्या या शोमध्ये अनेक आश्‍चर्यकारक खुलासे होत आहेत. मागच्या वेळी सपना चौधरीनं तिच्या आयुष्याती खळबळजनक खुलासे करत सर्वांना हैराण केलं होतं. तर आता या सीझनमध्ये अभिनेत्री कोएना मित्रानंही तिच्या आयुष्यातील एका धक्कादायक खुलासा केला आहे. तिनं तिच्या एक्स बॉयफ्रेंड बद्दल जे काही सांगितलं ते ऐकून सर्वांनाच धक्का बसेल.
बॉलिवूड अभिनेत्री कोएना मित्रानं नुकत्याच बिग बॉसच्या घरात पार पडलेल्या अजब टास्कमध्ये खूप चांगलं प्रदर्शन केलं. त्यामुळे सोशल मीडियावर कोएनाचं खूप कौतुक केलं जात आहे. तिच्या या परफॉर्मन्समुळे ती सर्वांची लाडकी स्पर्धक झाली आहे. तिच्या परफॉर्मन्सवरुन ती एका खंबीर महिला असल्याचं स्पष्ट झालं. अशातच खासगी जीवनाविषयी अतिशय धक्कादायक खुलासा करून कोएना सगळीकडे चर्चेत आली आह
पाचव्या दिवशी कोएना बिग बॉस हाउसमध्ये दलजीत कौर, माहिरा शर्मा, सिद्धार्थ डे यांच्यासोबत गप्पा मारत होती. दरम्यानं तिनं तिचा बॉयफ्रेंड आणि एका खतरनाक रिलेशनशिपविषयी सांगितलं. तिनं सांगितलं की तिचा एक्स बॉयफ्रेंड खूपच पॉजेसिव्ह होता. तो एक तुर्की होता आणि त्यानं एक दिवस तिला मुंबईतील तिच्या घराच्या बाथरुममध्ये बंद केलं होतं.
कोएना पुढे म्हणाली, तो मला सतत धमकी देत असे की तो माझ्याशी लग्न करुन माझा पासपोर्ट जळवून टाकेल आणि तुर्कीला निघून जाईल. त्याच्याशी ब्रेकअप केल्यानंतर मी अशा अवस्थेत होते की, त्यानंतर 3 वर्ष मी कोणालाच डेट करण्याचा विचारही केला नाही. बॉलिवूडमध्ये बोल्ड प्रतिमा तयार करणारी कोएना ’अपना सपना मनी मनी’ या सिनेमानंतर मोठ्या पडद्यावरून गायब झाली होती. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री असण्यासोबतच कोएना एक सुपर मॉडेल सुद्धा आहे. एकेकाळी ती बॉलिवूडमधील बेस्ट आयटम गर्ल म्हणून ओळखली जात असे