Breaking News

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत ऐन निवडणुकीत बिघाडी

सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत ऐन निवडणुकीत बिघाडी निर्माण झाली आहे. सोलापुरातील दोन मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकमेंकाविरोधात उमेदवारी दिल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. पंढरपूरचे काँग्रेस आमदार भारत भालके यांना राष्ट्रवादीने परस्पर उमेदवारी दिल्याचा राग म्हणून काँग्रेसने शिवाजीराव काळुंगे यांना भालकेंविरोधात उभे केले. याच खेळीला प्रत्युत्तर म्हणून शहर मध्य मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादीने जुबेर बागवान यांची उमेदवारी दाखल केली आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या आदेशाने सोलापुरात हे पाऊल उचलण्यात आल्याचे पदाधिकार्‍यांकडून सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे सोलापूर शहर कार्याध्यक्ष संतोष पवार म्हणाले, शहर मतदारसंघात राष्ट्रवादीला मानणारा वर्ग आहे. जुबेर बागवान यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी मुस्लिम समाजातील विविध संघटनांनी केली होती. त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे अर्ज मागे घेण्याच्या 7 तारखेपर्यंत दोन्ही पक्षांमधील बंडोबांची नाराजी दूर करण्यास पक्ष नेतृत्वाला कसरत करावी लागणार आहे.
पुण्यातही बिघाडी
पर्वती विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आबा बागूल यांनी शक्तीप्रदर्शन करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे आघाडीत बिघाडी झाल्याची स्थिती दिसून येत आहे. त्यानंतर शक्तीप्रदर्शन करत राष्ट्रवादी काँग्रेस व आघाडीच्या उमेदवार अश्‍विनी कदम यांनीसुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केला