Breaking News

मतदारसंघासाठी मुख्य निवडणूक निरीक्षक मोख्ता यांची नियुक्ती

अहमदनगर/प्रतिनिधी
भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार 225- नगर शहर विधानसभा मतदार संघ व 224- पारनेर विधानसभा मतदार संघासाठी मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून  सुदेशकुमार मोख्ता (भा.प्र.से) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या  मतदार संघातील सर्व निवडणूक प्रक्रियेचे निरीक्षण करणार आहेत.
मतदारांना निवडणूक विषयक काही  तक्रारी / आक्षेप असल्यास त्यांनी मुख्य निवडणूक निरीक्षक यांची शासकीय विश्रामगृह, अहमदनगर किंवा मो.9418812787 वर सकाळी 7 वाजेपासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यत संपर्क साधावा, असे सहा.निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार उमेश पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.