Breaking News

कोथरुडमध्ये बंडाचे वारे

चंद्रकांत पाटलांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत कोथरुड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. चंद्रकांत पाटलांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मतदारसंघात बंडाचे वारे वाहू लागले होते. जातपात आणि स्थानिक-बाहेरचा असा वाद पेटला होता. त्यामुळचे अर्ज दाखल करण्यापूर्वी स्वपक्षासोबतचे मित्रपक्षातील बंडोबांना थंड करण्याची कसरत चंद्रकांत पाटलांना करावी लागली. थेट जनतेतून निवडून येण्याचे पवारांनी दिलेले आव्हान चंद्रकांत पाटलांनी केवळ स्वीकारलचे नाही तर यापुढे पुण्यावर आपलचे वर्चस्व राहणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.

चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात कुणाला उमेदवारी द्यावी, याबाबत आघाडीमध्ये गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. तसेच पाटील यांना पराभूत करण्यासाठी विरोधकांचे एकच उमेदवार असावा, यासाठीही प्रयत्न केला जात होता. आता राष्ट्रवादीने याबाबत भूमिका घेत आपला पाठिंबा मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना जाहीर केला आहे. दरम्यान, भाजपने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना कोथरुडमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.