Breaking News

आत्मा मालिकमध्ये प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार

कोपरगाव/प्रतिनिधी
आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाच्या वतीने सन 2013 पासून इयत्ता 2 री ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आत्मा मालिक प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन करण्यात येते. शैक्षणिक वर्ष 2018-19 मधील परीक्षेचे बक्षिस वितरण नुकतेच पार पडले. या परीक्षेत इयत्ता 2 री व इयत्ता 10 वी मधील राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिविलेल्या विद्यार्थ्यांना आश्रमाचे संत जितेंद्रानंद महाराज, संत राजनंद महाराज, संत ब्रम्हांडानंद महाराज, अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी यांचे हस्ते स्मृतिचिन्ह व रोख रक्कम बक्षिसे देवून गौरविण्यात आले.

  यावेळी प्राचार्य निरंजन डांगे म्हणाले की, या वर्षी या परिक्षेस राज्यभरातून 15 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यापैकी १ हजार 847 विद्यार्थ्यांना राज्य, विभाग, जिल्हास्तरावर बक्षिसे देवून गौरविण्यात आले. यावेळी एकूण रक्कम रूपये 4 लाख 85 हजार रु. रकमेचे रोख बक्षिसे वितरीत करण्यात आले. इयत्ता 2 री पासूनच प्रज्ञाशोध परीक्षा आयोजित करणारी आत्मा मालिक राज्यातील एकमेव संस्था आहे. त्याचप्रमाणे शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये परीक्षेच्या स्वरूपात व बक्षिसामध्ये बदल करण्यात आलेला आहे. परीक्षेचे स्वरूप इयत्ता 5 वी, इ. 8 वी स्काॅलरशीप व इ. 10 वी एनटीएसई या परीक्षांच्या अभ्यासक्रमावर आधारित राहतील. तर राज्यात प्रथम येणा-या इयत्तानिहाय विद्याथ्र्यास लॅपटाॅप, द्वितीय क्रमांक मिळविणा-या विद्ययार्थंना सायकल याप्रमाणे वस्तूरूपी बक्षिसे राहणार असून एकूण 7 लाख 51 हजार  एवढया रकमेची बक्षिसे देण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांना सांगितले.

   आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी म्हणाले की, आज स्पर्धा परीक्षांचे युग आहे. भविष्याचा विचार करूनच आजची शिक्षण पद्धती असणे आवश्यक आहे. म्हणून आत्मा मालिक प्रज्ञाशोध परीक्षेच्या माध्यमातून इयत्ता 2 री पासून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची सवय व्हावी त्यांचे महत्व समजावे या हेतूने आत्मा मालिक प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन केले जाते.