Breaking News

केडगावची दहशत कायमची संपविणार : किरण काळे

अहमदनगर /प्रतिनिधी
“अनेक वर्षांपूर्वी केडगावचा नगरच्या हद्दीमध्ये समावेश झाला. परंतु योग्य नेतृत्वाअभावी आजही येथील पाणी, रस्ते, गटारी यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यामुळे निवडून आल्यानंतर आपण स्मार्ट केडगावची निर्मिती करणार आहे’’, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार किरण काळे यांनी केले आहे.
केडगाव मधील प्रचाराचा शुभारंभ करत असताना किरण काळे बोलत होते. यावेळी भारिपचे जिल्हाध्यक्ष डॉ.अशोक सोनवणे, सरचिटणीस सुनील शिंदे, युवक आघाडीचे अध्यक्ष सागर भिंगारदिवे, दिलीपराव साळवे, मयूर भिंगारदिवे, ईश्‍वर सोनवणे, सूरज कांबळे, अनूप धीवर, सुमन लोळगे, बंटी वैराळ, राहुल लोंढे, पंकज सामने, शेखर ठोंबे, अजय नेटके, अजिंक्य ठोंबे, सिद्धार्थ पाटील, स्वप्नील पाठक, सूरज माळी, नीलेश जाधव, शैलेश गायकवाड आदी उपस्थित होते.
काळे पुढे म्हणाले, केडगावमधील भागांमध्ये असणारी दहशत, राजकारण्यांनी पोसलेल्या गुंडांच्या टोळ्या यामुळे परिसरातील जनता कायम त्रस्त असते इथे घडलेल्या काही गोष्टींचं राजकीय भांडवल करण्यासाठी काही मंडळीनी केडगावच्या जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. ही अत्यंत निंदनीय बाब आहे. आपण मात्र केडगावचा विकास हे एकमेव आपले ध्येय आहे आणि त्यासाठी विधानसभेत सत्तापरिवर्तन महत्त्वाचे आहे. 
“मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उमेदवारी करत सक्षम तिसरा पर्याय दिला आहे. त्याला केडगावकरांनी भरभरून प्रतिसाद देखील दिलेला आहे. मला एकदाच आपली सेवा करण्याची संधी द्या’’, असे आवाहन यावेळी किरण काळे यांनी केले.