Breaking News

दुग्ध उत्पादनात 36.35 टक्के वाढ : गिरीजा सिंह

Milk Cans
नवी दिल्ली
देशातल्या दुध उत्पादनात 36.35 टक्के वाढ झाली असल्याचे केंद्रीय दुग्धविकास, मत्स्योत्पादन आणि पशुविकास मंत्री गिरीजा सिंह यांनी सांगितले. राष्ट्रीय दुध दिवसानिमित्त नवी दिल्ली इथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 2013-14 मध्ये दुग्ध उत्पादनाचे प्रमाण 137.7 दशलक्ष टन होते. 2018-19 मध्ये ते 187.75 दशलक्ष टनांवर पोहोचले आहे. त्याचप्रमाणे दुधाच्या दरडोई उपलब्धतेतही वाढ झाली असल्याचे सिंह यांनी सांगितले. 2013-14 मध्ये हे प्रमाण 307 ग्रॅम होते ते 2018-19 मध्ये 394 ग्रॅमवर पोहोचले आहे. दुग्ध उत्पादनाचा वार्षिक विकासदर 2009 ते 2014 या कालावधीत 4.2 टक्के होता. तो 2014-19 या कालावधीत वाढून 6.4 टक्क्यांवर पोहोचला. आरसेपमध्ये सहभागी होण्यास नकार देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या 10 कोटी शेतकर्‍यांचे हित जपले आहे, असे सांगून सिंह यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.