घोगरगावातून दोन लाखांचा ऐवज लांबवला
सराफी दुकान, दोन घरांमध्ये चोरी
कोळगाव/प्रतिनिधी :
श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव येथे शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी एक सराफी दुकान फोडले. तसेच दोन घरांमधूनही चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्या, चांदीचे दागिने लांबवले.
डहाळे ज्वेलर्स या दुकानातून एक लाख 56 हजारांचे दागिने लंपास करण्यात आले. विमल कांबळे व मुसभाई शेख यांच्या घरातून सुमारे 62 हजार रुपये रोख लंपास केली. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी (दि.23)च्या मध्यरात्री घोगरगाव येथे चोरट्यांनी मधुकर डहाळे यांच्या डहाळे ज्वेलर्स या दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला. दुकानातील सुमारे दीड लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने चोरट्यांनी लांबवले.
त्यानंतर चोरट्यांनी विमल बाळासाहेब कांबळे यांच्या घराकडे मोर्चा वळवला. घराची कडी उघडून घरातील 48 हजार रुपये रोख रक्कम घेऊन नंतर मुसाभाई शेख यांच्या घराचा दरवाजा त्यांनी उघडला. कपाटामधील 14 हजार रुपये रोख तसेच 6 हजार रुपये किमतीचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले.
याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात मधुकर डहाळे यांनी रविवारी सकाळी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी तपासासाठी श्वानपथक नेण्यात आले. श्वानाने मिरजगाव रस्त्यापर्यंत माग काढला. परंतु पुढे त्याला दिशा मिळाली नाही. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावीत करत आहेत.