Breaking News

भाजपचा शिवसेना संपवण्याचा प्रयत्न : उद्धव ठाकरे

युतीतील तिढा अद्याप सुटण्याची चिन्हे नसून, भाजपकडून शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर गंभीर आरोप केलेत. तसेच चर्चा करण्यासाठी आपले दारे उघडे असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. अमित शाह यांच्या वक्तव्याचा संदर्भ घेऊन पहिल्यांदाच माझ्यावर, ठाकरे कुटुंबीयावर खोटेपणाचा आरोप केला याचे दुःख वाटले असे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. शिवसेनेवर पहिल्यांदाच खोटारडेपणाचा आरोप झाला आहे. अमित शाह यांच्या नावाचा वापर करुन काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटे बोलले आहेत असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. सत्तेची खुर्ची माणसाला किती वेडे  करते हे मी पाहिले. देवेेंद्र फडणवीस यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. मी चर्चा थांबवली हे खरे आहे. 50-50 चा फॉर्म्युला ठरलाच नव्हता हे देवेंद्र फडणवीस म्हणाले हे साफ खोटे आहे, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.
काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद मी पाहिली ती पाहून मला आनंदही वाटला आणि दुःखही वाटलं. झाला की अनेक विकासकामांचा पाढा त्यांनी वाटला त्यावेळी त्यांनी उल्लेख केला की शिवसेना सोबत होती की नाही? असा उल्लेखही त्यांनी केला. आम्ही सोबत नसतो तर ही विकासकामं तुम्ही करु शकला असता का? तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविरोधात मी काहीही बोललो नाही असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. शब्द देऊन फिरवण्याची वृत्ती शिवसेनेची नाही तर भाजपाची आहे असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
अमित शाह आणि कंपनीविरोधात अविश्‍वास आहे असेही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले. इतकंच नाही तर मला खोटं ठरवणार्‍या देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी बोलणार नाही. माझ्यावर खोटेपणाचा आरोप केला ते दुर्दैवी आहे. काळजीवाहूंनी असा काही प्रयत्न करु नये असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.