कर्जतमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचा जल्लोष
देवेंद्र फडणवीस यांनी पुरेसे संख्याबळ नसल्याने राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.त्यामुळे नव्याने स्थापन झालेले फडणवीस सरकार काही तासातच कोसळले.त्यामुळे आता शिवसेना,राष्ट्रवादी तसेच काँग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येण्याची वाट मोकळी झाली.फडणवीस सरकार कोसळल्याची बातमी येताच कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.
या जल्लोषामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले, सुनील शेलार, नानासाहेब निकत, अशोक जायभाय, आनंदराव तोरडमल, सुदाम धांडे, स्वप्नील तनपुरे, राजेंद्र तोरडमल, संतोष म्हेत्रे, वसंत कांबळे, राहुल खराडे, प्रकाश धांडे, भूषण ढेरे, शब्बीरभाई पठाण, काकासाहेब शेळके आदी सहभागी झाले होते.