Breaking News

नगरपरिषदेचा स्तुत्य उपक्रम : टाकाऊ बाटल्यांपासून उत्पन्नाचे साधन

माथेरान
 माथेरान मध्ये पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने इथे पिण्याच्या पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या त्याचप्रमाणे अन्य मद्याच्या काचेच्या बाटल्यांचा खच गावातील गटारात आणि कचराकुंडीत इतस्ततः पडलेला असायचा. त्यामुळे मागील काळात इथे सर्वत्र अस्वच्छता दिसून येत होती.दरवेळी स्वच्छ सर्व्हेक्षण वेळीच गावातील कचर्‍याचे मोठया प्रमाणात संकलन करून डंपिंग ग्राऊंडवर नेला जायचा. तर अनेकदा या प्लास्टिक अन्य भागातून येणार्‍या महिला या प्लास्टिक आणि काचेच्या बाटल्या विक्रीसाठी नेत होत्या. याचाच लाभ त्याना होत होता. परंतुस्वच्छता दूत म्हणून ज्यांची ओळख निर्माण झाली आहे असे कार्यतत्पर मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी प्रभारी पदाचा कार्यभार हाती घेतल्यावर अनेक सकारात्मक कामे पूर्ण करताना या टाकाऊ बाटल्यांचा नगरपरिषदेला उत्पन्नाचे साधन म्हणून सदुपयोग केला आहे. नगरपरिषदेच्या कचरा वेचक महिला,आणि सफाई कामगार हे नियमितपणे गावातील लोजिंग तसेच हॉटेलमध्ये जाऊन सर्वच प्रकारचा कचरा संकलन करीत असतात. या प्लास्टिक बाटल्या मशीन मध्ये बेलिंग करून जवळपास एक हजार बाटल्या गोणीत भरून विक्रीसाठी भंगारवाले कंपनी मध्ये नेत आहेत. चार महिन्यापासून या माध्यमातून तीस हजार रुपयांचे उत्पन्न नगरपरिषदेला प्राप्त झाले असून अद्याप पंचवीस वर्षे रुपयांचा हा माल शिल्लक आहे.
स्वच्छते बरोबर इथे मोठया प्रमाणावर साठत असलेल्या सर्व प्रकारच्या बाटल्या एकत्रित करून त्यांची विक्री केली जात आहे यातूनच नगरपरिषदेला उत्पन्नाचे साधन मिळत आहे.त्यामुळे गावात स्वच्छता आणि प्लास्टिक पासून होणार्‍या प्रदूषणावर मात करता येईल.
  प्रसाद सावंत - गटनेते तथा बांधकाम सभापती माथेरान नगरपरिषद