Breaking News

मुस्लिम पक्षकारांनी जमिनीची ऑफर नाकारावी : ओवेसी

फेरविचार याचिकेसाठी सल्ला घेण्याचे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे वक्तव्य

नवी दिल्ली
अयोध्येतील निकालानंतर सर्वच स्तरातून स्वागत केले जात असताना एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयावर नाराजी व्यक्त केली असून. मुस्लिम पक्षकारांनी पाच एकर जमिनीची ऑफर नाकारावी, असे आवाहन केले आहे. आजचा निकाल म्हणजे सत्यावर आस्थेचा विजय आहे. तसेच मुस्लिम पक्षकारांनी जमिनीची ऑफर नाकारावी, पाच एकर जमिनीची खैरात नको’, असे वक्तव्य करत ओवेसींनी नाराजी व्यक्त केली आहे.
तसेच, राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयाने आज ऐतिहासिक निकाल जाहीर केला. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभारण्यात यावे, तर मशिदीसाठी मोक्याच्या ठिकाणी पाच एकर जागा देण्यात येईल, असा निर्णय घटनापीठाकडून एकमताने देण्यात आल्यानंतर मशिदीसाठी मोक्याच्या ठिकाणी देण्यात आलेली पाच एकरची जागा नाकारली. या निकालावर बोलतांना ओवेसेंची कोर्टाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत असताना संघावर देखील निशाणा साधला आहे. यावेळी आम्ही बाबरी मशिदीला आम्ही विसरावं का? तसेच कोर्टाच्या निकालावर नाराजी व्यक्त करू नये का?, असा प्रश्‍नदेखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. तसेच, ‘जर बाबरी मशीद पाडली गेली नसती, तर सर्वोच्च न्यायालयाने काय निर्णय दिला असता? सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंतिम असला तरी अचूक नाही. ही लढाई कायदेशीर हक्कासाठी होती. पाच एकर जमिनीची भीक नको,’ अशी भूमिका ओवेसी यांनी मांडली आहे.
दरम्यान, अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी ऐतिहासिक निकाल दिला. वादग्रस्त 2.77 एकर जागेची मालकी रामलल्ला विराजमान अर्थात हिंदू पक्षकारांकडे देण्याचा निकाल न्यायालयाने दिला. त्याचवेळी केंद्र सरकारने 1993 मध्ये अधिग्रहित केलेल्या उर्वरित 67.6 एकर जागेपैकी या पाच एकर जागा मुस्लिम पक्षकारांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानंतर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या पदाधिकार्‍यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आम्ही आदर करतो. पण त्यातील काही निरीक्षणे आम्हाला अमान्य आहेत. विशेषतः केवळ नमाज पठण होत नव्हते म्हणजे तिथे मशिद नव्हती, असे न्यायालयाने म्हणणे आम्हाला मान्य नाही. न्यायालयाने जो निकाल दिला आहे. त्यासाठी वापरलेले सर्व पुरावे हे त्या ठिकाणी मशिद होती असेच आहेत. तरीही न्यायालयाने वादग्रस्त जागेमध्ये आम्हाला हिस्सा दिलेला नाही. आता या प्रकरणी आम्ही ज्येष्ठ वकिलांचा सल्ला घेऊन फेरविचार याचिका दाखल करायची की नाही, हे ठरवू असे झफरयाब जिलानी यांनी सांगितले.


निकाल असमाधानकारक : जिलानी
अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी दिलेला निकाल आमच्यासाठी असमाधानकारक असल्याचे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे पदाधिकारी झफरयाब जिलानी यांनी म्हटले आहे. या निकालासंदर्भात आम्ही ज्येष्ठ वकिलांशी सल्लामसलत करू आणि त्यानंतर फेरविचार याचिका दाखल करायची की नाही हे ठरवू, असेही त्यांनी सांगितले.