Breaking News

राज ठाकरे यांचे हिंदुत्वाच्या राजकारणाचे संकेत


मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले आहे. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँगे्रस आणि काँगे्रस सत्तेत सहभागी झाल्यामुळे शिवसेनेचे हिंदुत्व मवाळ झाले आहे. त्यामुळे राज्यात हिंदुत्वाचे राजकारण आक्रमकपणे मांडणारा नेता नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हिंदुत्वाचा मुद्दा कॅच करण्याच्या विचारात आहेत. 
मनसेने आपल्या 13 वर्षांच्या वाटचालीत आजपर्यंत एकही महाअधिवेशन आयोजित केलेले नाही. गोरेगाव येथील नॅस्को मैदानावर होणाजया या महाअधिवेशनाच्यानिमित्ताने मनसे एका मोठ्या शक्तीप्रदर्शनाच्या तयारीत आहे. मनसे यावेळी कोणती भूमिका घेते, याकडे सत्ताधारी शिवसेनेबरोबरच विरोधी भाजपचेही लक्ष लागले आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी 23 जानेवारी रोजी त्यांनी पक्षाचे पहिले महाअधिवेशन आयोजित केले असून ‘येथून नव्या स्वरुपातील राज ठाकरे तुम्हाला दिसेल’, अशा शब्दांत त्यांनी पदाधिकार्‍यांना नव्या राजकीय भूमिकेचे संकेत अलीकडेच दिले आहेत. दरम्यान मनसेच्या पदाधिकार्‍यांची एक बैठक अलीकडेच पुण्यात झाली. त्यावेळी पदाधिकाजयांनी राज ठाकरे यांना ‘आपला शत्रू कोण’, असा सवाल केला. एकेकाळी आपण नरेंद्र मोदी व भाजपची स्तुती केली. तर लोकसभा निवडणुकीत आपण मोदी व भाजपला विरोध केला. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आपण घेतलेल्या भाजपविरोधी भूमिकेचा राष्ट्रवादी काँग्रेसला लाभ झाला. मात्र त्यानंतर राष्ट्रवादीने सेनेबरोबर सत्ता स्थापन केली. तर मनसेला काहीच फायदा झाला नाही. येत्या महापालिका निवडणुकीत आपला शत्रू कोण ते जाहीर करा, अशी आग्रही मागणी पदाधिकाजयांनी केली. शिवसेनेच्या सत्तेमुळे त्यांचा हिंदुत्ववादी मतदार अवस्थ असल्याबाबत चर्चा झाली. त्यानंतर राज यांनी वरील घोषणा केली.