Breaking News

निमगाव वाघा येथे रविवारी मोफत दंतरोग तपासणी शिबीराचे आयोजन

अहमदनगर (प्रतिनिधी)- 
नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व डॉ.गोरे डेन्टल क्लिनीक (माळीवाडा) च्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.26 रोजी मोफत दंतरोग तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे यांनी दिली.
गावातील नवनाथ मंदिराच्या प्रांगणात रविवारी सकाळी 8 ते 12 या वेळेत हे शिबीर होणार आहे. शिबीरात ग्रामस्थांची दंत तपासणी करुन, मौखिक आरोग्या संदर्भात डॉ.सुदर्शन गोरे व डॉ.चैताली गोरे मार्गदर्शन करणार आहेत. दंत विकारावर पुढील उपचार माळीवाडा येथील डॉ.गोरे डेन्टल क्लिनीक मध्ये माफक दरात केले जाणार आहे. या शिबीराचा पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घेण्याचे आवाहन डॉ.सुदर्शन गोरे यांनी केले आहे. शिबीरात सहभागी होण्यासाठी नांव नोंदणी आवश्यक असून, नांव नोंदणीसाठी डॉ.सुदर्शन गोरे 9028306020 व पै.नाना डोंगरे 9226735346 यांना संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.