Breaking News

दिल्लीत गटार साफ करताना 5 कामगारांचा मृत्यू


नवी दिल्ली/प्रतिनिधी : मोतीनगर परिसरातील डीएलएफ फ्लॅट्सजवळ बंदिस्त गटाराची साफ-सफाई करताना त्यातून बाहेर पडलेल्या विषारी वायूमुळे पाच स्वच्छता कर्मचार्‍यांचे मुत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. भाजपचे करोल बाग जिल्हाध्यक्ष भरत भूषण मदन यांनी सांगितले, ही पहिलीच घटना नसून यापूर्वी देखील अशा अनेक घटना दिल्लीत घडल्या आहेत. यासाठी आम आदमी पार्टीचे सरकार जबाबदार आहे. त्यांनी दिल्लीच्या जनतेला वचन दिले होते की, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दिल्लीतील सर्व गटारे स्वच्छ करण्यात येतील. मात्र, इतके मृत्यू झाल्यानंतरही जुन्या पद्धतीनेच गटारांची साफसफाई केली जात आहे. या घटनेनंतर वार्ड 99 च्या नगरसेवक सुनीता मिश्रा यांनी मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदतीची मागणी केली आहे.