Breaking News

शिक्षणासोबत खेळही महत्वाचा : गोपाळघरे

जामखेड प्रतिनिधी

चौदाव्या वित्तअयोगातून जिल्हा परिषदेच्या शाळेस देण्यात आलेल्या प्रोजेक्टर व टॉबमध्ये सर्व शालेय अभ्यासक्रम असून याद्वारे मुलांच्या शैक्षणिक गुणवतेमध्ये वाढ होणार आहे. तसेच अंगणवाडीस १७ प्रकारच्या विविधखेळण्यांमूळे मुलांना शिक्षणाची आवड निर्माण होईल . शिक्षणासोबत खेळही महत्वाचा असे प्रतिपादन सरपंच, संजय गोपाळघरे यांनी केले.

खर्डा ग्रामपंचायतच्या चौदाव्या वित्त आयोगातून खर्डा ग्रामपंचायत अंतर्गत १४ शाळा व २४ अंगणवाड्यांना शालेय साहित्य व खेळणीची वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. सरपंच संजय गोपाळघरे यांच्याअध्यक्षतेखाली झालेल्या यावेळी जिल्हा परिषद खर्डा केंद्रप्रमुख लक्ष्मीकांत देशमुख , माजी उपसरपंच भागवत सुरवसे, ग्रामपंचायत सदस्य संतोष थोरात, गणेश डाडर, विकास शिंदे,

प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापीका जोती रासकर, जयश्री मुकणे, शबाना बागवान, स्वाती गलांडे, ज्ञानेश्वर कौले,  आदी उपस्थित होते.