Breaking News

ज्युनिअर अॅथलेटिक्स स्पर्धा आजपासून रंगणार


औरंगाबाद

औरंगाबाद जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेतर्फे आयोजित ज्युनिअर अॅथलेटिक्स निवड चाचणी व अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून हा थरार आजपासून रंगणार आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अॅथलेटिक्स संकुलात ही स्पर्धा शनिवारी सकाळी सात वाजता सुरू होणार आहे. या स्पर्धेत १४, १६, १८ व २० वयोगटातील मुले-मुली सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेतूनविभागीय स्पर्धेसाठी औरंगाबादचा संघ निवडला जाणार आहे. अधिक माहितीसाठी अनिल निळे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संघटनेचे सचिव डॉ. फुलचंद सलामपुरे यांनी केले आहे.