Breaking News

स्वाईनफ्लुच्या आजाराने कर्जतला प्राध्यापकाचा मृत्यू


कुळधरण : किरण जगताप

कर्जत तालुक्यातील नागलवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रा. अशोक सखाराम डाडर (वय ६२) यांचा दि.१९ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास स्वाईन फ्लूच्या आजाराने मृत्यू झाला.

प्रा.अशोक डाडर हे गेल्या दोन महिन्यांपासून पुणे येथे आपल्या मुलांकडे राहायला गेले होते. त्यांना मागील दहा-पंधरा दिवसांपूर्वी त्रास होऊ लागल्याने पुणे येथील के.एम.हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.तेथेच त्यांचा मृत्यू झाला.प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना निमोनिया झाल्याचे सांगण्यात आले. मात्र,आजाराचे निदान होत नसल्याने त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेली.अखेर बुधवारी रात्री के.एम. हॉस्पिटलयात त्यांचा मृत्यू झाला. प्रा.डाडर यांच्या आजाराचे निदान करण्यासाठी करण्यात आलेल्या तपासण्यांमध्ये त्यांना स्वाईन फ्लू आजाराची लागण झाली असल्याचे समजले.