Breaking News

स्व. भाई गुजर चषक 2018 चे शानदार उद्घाटन

कराड, दि. 8 (प्रतिनिधी) : येथील नगरसेवक इंद्रजीत गुजर (कॅप्टन) मित्र परिवाराच्यावतीने आयोजित स्व. भाई गुजर चषक 2018 (पर्व-2) ला उत्साही वातावरणात प्रारंभ झाला. दि. 8 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर 2018 अखेर चालणार्‍या या स्पर्धेंचे उद्घाटन कराड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष सौ. रोहिणी शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी गटनेते सौरभ पाटील, युवा नेते इंद्रजीत चव्हाण, राष्ट्रीय कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष नगरसेवक राजेंद्र माने, नगरसेवक इंद्रजीत गुजर, नगरसेवक फारूकभाई पटवेकर, बनवडीचे माजी सरपंच व विद्यमान मार्गदर्शक सदस्य शंकरराव खापे, नगरासेवक मोहसीन आंबेकरी, सुहास जगताप, शिवाजीराव पवार व सुरेश पाटील, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष पोपटराव साळुंखे, जिल्हा परिषदेचे सदस्य सागर शिवदास, नगरसेविका सौ. विद्या पावस्कर, नगरसेविका सौ. अंजली कुंभार, पंचायत समिती सदस्य सौ.वैशाली पवार, सुरेश पवार, अशुतोष जयवंत जाधव, सैदापूर ग्रामपंचायत सदस्य मुरलीधर जाधव, विवेक जाधव, वडोली निळेश्वरचे उपसरपंच दयानंद पवार, ऑल इंडिया चँपियन पै. जालींदर चव्हाण, सुनिल जाधव, बबलू शेख, युवा नेते अक्षय सुर्वे, पार्लेचे माजी सरपंच व विद्यमान मार्गदर्शक सदस्य राहूल पाटील-पार्लेकर, मिलींद वाघमारे, प्रमोद पाटील, अभिमन्यु अनिल गुजर, गुलाबराव पाटील, रणजीत पाटील, सोमनाथ नलवडे, आबा कोठावळे, सुनिल मानसिंगराव पाटील, बनवडीचे माजी उपसरपंच विकास करांडे, राजूशेठ शिंदे, राजेंद्र जाधव, सामाजिक कार्यकर्ते अरूण शेळके, रमेश मोहिते, युवराज पाटील, अभिजीत मोडिगीरी, प्राचार्य डॉ. अन्वर मुल्ला, उपप्राचार्य प्रा. हणमंत कुंभार व प्रा. अयुब कच्छी यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी नगराध्यक्ष सौ. रोहिणी शिंदे यांचे हस्ते श्रीमंत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास व नगरसेवक सुरेश पाटील यांचे हस्ते स्व. भाई गुजर यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर नगराध्यक्ष रोहीणी शिंदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. झाला. स्पर्धेमध्ये मुंबई, पुणे, अकोला, नंदूरबार, गडचिरोली या महाराष्ट्र राज्यातील संघाबरोबरच महाराष्ट्र राज्याबाहेरच्या गुजरात, कोलकता (पश्चिम बंगाल) व गोवा राज्यातील संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी युवराज पाटील, अभिजीत मोडिगीरी, किरण पवार, राजेंद दळवी, तुषार खांडे, राहुल शिवदास, सुहास जाधव, अभिजीत शिंदे यांच्यासह मित्र परिवार परिश्रम घेत आहे.