Breaking News

फलटण शहरात 600 किलो प्लास्टिक जप्त


फलटण (प्रतिनिधी) : राज्य शासनाने केलेल्या प्लास्टिक बंदी निर्णयाबाबत फलटण शहरात प्रदूषण नियंत्रण मंडळ जिल्हा कार्यालय आणि फलटण नगरपरिषद यांनी संयुक्तरित्या धडक मोहिमेद्वारे शहरातील 9 दुकानातून सुमारे 600 किलो प्लॉस्टिक साठा जप्त करुन त्यांचेकडून 45 हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांनी दिली. 

या मोहिमेत प्रदुषण नियंत्रण मंडळाचे जिल्हा कार्यालयातील शंकर केंदुळे, नगर परिषद आरोग्य विभाग प्रमुख विनोद जाधव, प्रकाश पवार, अनंत वाडकर, दीपक पुजारी, सचिन घोलप, अनिल बिडकर, सुनील गवळी, रफिक महात, बांद्राबळ गायकवाड, अमोल आवळे, अनिल भापकर वगैरे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. या मोहिमेपूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे शंकर केंदुळे व मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांनी मोहिमेत सहभागी झालेल्या अधिकारी, कर्मचार्‍यांना मार्गदर्शन करुन प्लास्टिक बंदी कायद्याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यानंतरच धडक मोहिम राबविण्यात आली. आगामी काळात प्लास्टिक बंदी कायद्याची कडक व काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याने कोणीही व्यापार्‍याने शहरात नियमबाह्य प्लास्टिक पिशव्या अथवा अन्य प्लास्टिक वस्तू विक्रीस आणू नयेत, असे आवाहन मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांनी केले आहे.