Breaking News

भिडेवाडा समर्थनार्थ परळी शहर दणाणले

परळी (प्रतिनिधी)- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली शाळा पुण्यातील भिडेवाड्यात काढून बहुजन समाजातील मुली स्त्रियांना ज्ञान देण्याचे महान कार्य सुरु केले तो भिडेवाडा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्या भिडेवाड्यास शासनाने जागतिक दर्जाचे स्मारक घोषित करावे या मागणीसाठी आज परळीत भिडेवाडा बचाव समन्वयक समिती च्या वतीने आयोजित केलेल्या निवेदन मोर्चात माळी समाज व फुले प्रेमी,महिला व पुरुष मोठ्या संख्येने पहिल्यांदाच रस्त्यावर उतरले. दरम्यान परळीतून भिडेवाडा बचाव चा पेटवलेला हा वनवा राज्यात व देशाच्या कानाकोपर्‍यात पोहचवण्याची गर्जना समन्वयक समितीने केली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी कि पुणे येथील बुधवार पेठेत येते असलेल्या भिडेवाड्यात १ जानेवारी १८४८ रोजी सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी पहिली शाळा सुरु केली या शाळेच्या माध्यमातून बहुजन समाजातील स्त्रियांमध्ये ज्ञानजोत पेटवण्याचे महान कार्य ज्या भिडे वाड्यातून केलं त्या भिडे वाड्याकडे आजपर्यंत शासनाने दुर्लक्ष केले आहे तर दुसरीकडे बिल्डर च्या माध्यमातून भिडेवाडा नष्ट करून त्या ठिकाणी मोठी इमारत उभा करण्याच्या तडजोडी सुरु आहेत परंतु ज्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी देशातील स्त्रियांची पहिली शाळा काढली आणि तेथूनच बहुजन महिलां मध्ये ज्ञानज्योत पेटली अश्या महान कार्य घडलेल्या आणि ऐतिहासिक भिडेवाडा आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे या वाड्याला शासनाने राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषणा करावी आणि जागतिक दर्जाची ऐतिहासिक वास्तू म्हणून निर्माण करावी या मागणीसाठी आज पहिल्यांदाच या आंदोलनाचा वनवा पेटवला गेला भिडेवाडा बचाव हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समन्वयक समिती हा मोर्च्या यशस्वी करण्यासाठी मागील २ महिन्या पासून प्रत्येक गावोगाव जाऊन माळी समाज व फुले प्रेमींना आंदोलन विषयी ची माहिती देऊन जागृत करण्याचे कार्य केले आणि त्या संघर्ष समितीला यश आले असून श्री संत सावता महाराज मंदिर येथून सकाळी १० ३० वाजता निघालेल्या भव्य मोर्च्या ने भिडेवाडा बचाव या जयघोषाने परळी शहर दणाणून गेले होते. विशेष म्हणजे संत सावता महाराजांची पुण्यतिथी निमित्त दिंडी सोहळा सोडला तर माळी समाज व माळी समाजातील महिला पहिल्यांदाच हजारोच्या संख्येने रस्त्यावर उतरल्या हे विशेष. तहसील कार्यालयावर हजारोच्या संख्येत निघालेला हा मोर्च्याने शांतता व स्वच्छतेचा संदेशच दिला ढोल ताशांच्या गजरात आणि जोरदार घोषणाबाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते तर तहसील येथे धडकल्या मोर्च्यात चिमुकल्या मुलींनी भिडेवाडा बचाव च्या समर्थनार्थ सरकारला केलेल्या आव्हानाने अनेकांचे हृदय हेलावून जात होते. मुलींच्या तोंडातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द प्रत्येकाच्या अंगावर काटा उभारत होता विशेष म्हणजे या आंदोलनात स्वयं स्फुर्तीनी माळी समाज हजारोच्या सांख्येने पहिल्यांदाच रस्त्यावर उतरल्याने अनेक राजकीय पक्ष व संघटनांच्या भुवया उडाल्या दरम्यान आजच्या या मोर्च्यास सर्व राजकीय पक्ष संघटनांनी पाठिंबा जाहीर करून अनेक पदधिकार्यानी सहभाग हि नोंदवला होता. त्या सर्वांचे भिडेवाडा बचाव समितीने कृतज्ञता व्यक्त करून भिडेवाडा बचाव हा पेटवलेले आंदोलनाचा वानवा राज्यात व देशाच्या कान कोपर्‍यात पोहोचवणार असल्याची गर्जना केली आहे. दरम्यान आंदोलनातील संख्या पाहता पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त ठेवला होता तर आंदोलन समपल्या नंतर आयोजित केलेल्या नाश्ता व पिलेल्या पाण्याचे पडलेले ग्लास मोर्चातील प्रत्येक व्यक्तीने एकत्र करून स्वच्छतेचा संदेशच या आंदोलनातून दिला आणि हे आंदोलन शांततेत पार पडले.