Breaking News

गळक्या व्हॉल्वमुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी


अंबाजोगाई (प्रतिनिधी)- शहर व परिसराची तहान भागवणार्‍या मांजरा धरणात २२५ दलघमी साठवण क्षमतेच्या फक्त १% पाणीसाठा शिल्लक राहिल्याने अंबाजोगाई शहर पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर आहे. त्यामूळे शहरामधील नागरिकांची चिंता वाढली वाढली आहे. त्यात अजुन भर म्हणुन रिंग रोड लगतच्या वॉटर एअर व्हॉल्वद्वारे मोठया प्रमाणात पाण्याची गळती होऊन दररोज हजारो लीटर पाण्याची नासाडी होत आहे. ही बाब नगर परिषद प्रशासनाच्या वारंवार कानावर घालून सुद्धा यावर अद्याप कसलीही कार्यवाही झाली नाही.बीड-लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यालगतच्या अनेक गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणार्‍या मांजरा धरणात सध्या केवळ मृतसाठा शिल्लक आहे. दोन वर्षे चांगली गेल्यानंतर यावर्षी पावसाने पुन्हा दगा दिला. यंदा धरण क्षेत्रात फक्त २५० मिमी एवढाच पाऊस झाला असल्यामुळे पाणी साठ्यात कसलीच वाढ होवू शकली नाही. किरकोळ पावसामुळे धारण अजूनपर्यंत तरी आपला तळ कसा-बसा झाकून आहे. एवढी भीषण परिस्थिती समोर असूनही अंबाजोगाई नगर परिषदेला याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या मुख्य पाईपलाईनवरील अनेक व्हॉल्वमधून हजारो लिटर पाण्याची गळती होत आहे. काही जागरून नागरिकांनी ही बाब नगर परिषद प्रशासनाच्या नजरेला आणून दिली तरीही अद्याप व्हॉल्व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले नसल्याने खेदयुक्त आशाचार्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे संभाव्य टंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन संबंधित अधिकार्‍यांनी व प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करुन गळती रोखावी अशी मागणी निसर्गमित्र अनिकेत डीघोळकर यांनी केली आहे