Breaking News

मराठवाडा साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी डॉ. सतीश साळुंके


बीड (प्रतिनिधी)- मराठवाडा साहित्य परिषदेच्या बीड शाखेची निवडणूक दि.७ ऑक्टो.१८ रोजी पार पडली असून प्रसिध्द नाटककार आणि इतिहासकार डॉ. सतीश साळुंके यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली . शिरूर कासार येथील जेष्ठ साहित्यिक विठ्ठल जाधव यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. या यावेळी बिनविरोध निवडण्यात आलेली कार्यकारिणी अशी- उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. कांचन श्रृंगारपुरे, कार्यवाह प्राचार्य जे.एम. पैठणे, सहकार्यवाह मंगेश रोटे आणि एड.मंजूश्री दराडे, कोषाध्यक्ष प्रशांत मुळे. कार्यकारिणी सदस्य म्हणून प्रा.शिवाजी केंद्रे, जगन्नाथ कांबळे, प्रा. हनुमंत भूमकर, श्रीराम गिरी व सुधा साळुंके यांची निवड करण्यात आली. त्यावेळी सर्वानुमते सल्लागार मंडळ निवडण्यात आले असून यात प्राचार्य डॉ. दीपा क्षीरसागर एड. उषाताई दराडे प्रा. सुशीलाताई मोराळे आणि श्रीमती मंगला मोरे यांचा समावेश आहे.
यावेळी पुढील वर्षी मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने राबवणार्‍या विविध साहित्यिक उपक्रमांची माहिती देण्यात आली. आरंभी डॉ. साळुंके यांनी मसापच्या बीड शाखेच्या कामाचा वृत्तांत मांडला. त्यानंतर उमेदवारी अर्ज़ दाखल झालेल्यांची नावे निवडणूक निर्णयअधिकारी विठ्ठल जाधव यांनी नमूद केली व कार्यकारणीची बिनविरोध निवड झाल्याचे त्यांनी घोषित करून सभेला मार्गदर्शन केले. या प्रसंगी शिरूर कासारचे पत्रकार सतीश मुरकुटे उपस्थित होते. शेवटी उपाध्यक्ष प्राचार्य डॉ.कांचन शृंगारपुरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.