Breaking News

उचल घेऊन मजूर पसार झाल्याने मुकादमाची आत्महत्या


गेवराई,(प्रतिनिधी)- तालुक्यातील टाकळगव्हाण येथील एका मुकादमाने कारखान्याकडून उचल घेऊन मजुरांना वाटली. मात्र, मजुरांनी उचल घेऊन ऐनवेळी पलायन केले. त्यामुळे कर्जबाजारी झालेल्या मुकादमाने विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्या केली.

श्रीराम विश्वनाथ आडागळे (४५, रा. टाकळगव्हाण) असे मयत मुकादमाचे नाव आहे. साखर कारखान्याला मजूर पुरविण्यासाठी त्यांनी ८ लाख रुपये उचल घेेतली होती. दहा मजुरांना त्यांनी उचल म्हणून रक्कम वाटप केली. मात्र, हंगाम सुरु झाल्यानंतर मजूर्ऊस तोडीला आले नाहीत. त्यांचा थांगपत्ता लागत नसल्याने अडागळे अडचणीत सापडले होते. कारखान्याचे पैसे कसे परत करायचे? या विवंचनेने त्यांना ग्रासले होते.
त्यांची जमीन कारखान्याकडे गहाण असल्याने ते अधिकच निराश होते. नैराश्येतून त्यांनी रविवारी रात्री विषारी द्रव प्राशन केले.त्यानंतर त्यांना नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले.