Breaking News

संघ संस्कारच कार्याची ऊर्जा देतात
मनमाड
प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांची खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांच्या शिफारशी वरून रेल्वे मंत्री .पियुष गोयल यांनी मध्य रेल्वेच्या मुंबई क्षेत्राच्या क्षेत्रीय रेल्वे सल्लागार समितीवर नियुक्ती केली म्हणून मनमाड शहर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातर्फे नितीन पांडे यांच्या या नवीन जबाबदारीचा आगळ्यावेगळ्या पध्दतीने सत्कार कार्यक्रम संपन्न झाला
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा प्रचारप्रमुख रमाकांतजी मंत्री यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना सांगितले की, गेल्या अडीच दशकांपेक्षा जास्त कालावधीमध्ये नितीन पांडे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्‍व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय जनता पार्टी या संघ परिवारातील संघटनांमध्ये विविध पदांवर जबाबदार्‍या यशस्वीपणे निभावल्या. 1990 व 1992 च्या अयोध्या येथील विश्‍व हिंदू परिषदेतर्फे आयोजित श्रीराम कारसेवेत नितीन पांडे यांचा सक्रिय सहभाग राहिला असून त्यांनी 1990 साली 16 दिवस गाजीपूर उत्तर प्रदेश येथे कारावास देखील भोगला आहे. सध्या ते मनमाड सार्वजनिक वाचनालयाचे सचिव म्हणून कार्यरत असून अत्यंत कठीण काळात त्यांनी मनमाड शहर भाजपचे कार्य अत्यंत निष्ठेने केले आहे. अशा विविध आघाड्यांवर निस्वार्थपणे काम करणार्‍या आणि आपल्या जवळ वावरणार्‍या नितीन पांडेंना केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडून एक फार मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. 700 स्टेशनचे कार्यक्षेत्र असणार्‍या समितीचे कार्य असणार आहे. सदैव हिंदूत्व असो किंवा कुठलेही सामाजिक कार्य असो तत्परतेने हो म्हणणार्‍या आपल्याच परिवारातील पांडे यांचा हा सत्कार व्हावा म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.वनवासी कल्याण आश्रमचे प्रमुख व ज्येष्ठ स्वयंसेवक रंगनाथ किर्तने व चांदवडकर सर यांच्या हस्ते नितीन पांडे यांचा शाल, श्रीफळ देवून यथोचित सत्कार करण्यात आला. नितीन पांडे हे निस्वार्थी राजकीय सामाजिक कार्यामुळे मनमाड शहरात ओळखले जातात. त्यांच्या कार्याचा एक नैतीक दरारा आहे कोणत्याही कार्याचा पूर्ण अभ्यास करुन ते कार्य तडीस न्यायचे हा पांडे यांचा एक वैशिष्ट्यपूर्ण गुण आहे. एखादा कार्यक्रम असो किंवा आंदोलन असो त्याचे नेटके नियोजन करुन त्यातून चांगला निकाल निर्माण करण असे सातत्याने करणारे चतुःरस्त्र व्यक्तिमत्त्व असणारे नितीन पांडे आपली सामाजिक जबाबदारी पार पाडतांना अनेक गुंतवणुकदारांना भविष्यकालीन आर्थिक सुरक्षिततेसाठी गुंतवणुकीचे उत्कृष्ट मार्गदर्शन करतात असे रक्तदान चळवळीच्या कार्यात नितीन पांडे हे स्वतः तर ऐच्छिक रक्तदाते आहेतच परंतु इतपर न थांबता गेल्या 14 वर्षापासून सातत्याने त्यांनी सर्वांना सोबत घेवून रक्तदान शिबीराचे आयोजन यशस्वीरित्या केले आहे. असे उद्गार आपल्या शैलीदार व काव्यमय शैलीत सुप्रसिध्द कवी प्रदीप गुजराथी यांनी काढले कोणत्याही कार्यात हजर राहून जबाबदारी स्विकारणे हा नितीन पांडे यांचा गेल्या 27 वर्षातला अनुभव आहे. सामाजिक कार्यात व राजकीय क्षेत्रात निस्वार्थपणे असे कार्यकर्ते क्वचितच आढळतात. पांडे हे त्यातील एक उदाहरण आहे असे प्रतिपादन किशोर नावरकर यांनी आपल्या भाषणात सांगितले.
मी राष्ट्रीय स्वसंयेवक संघाच्या संस्कारातून तयार झालो आहे माझ्या घरात संघ कार्याची तिसरी पिढी काम करते मी संघाचा स्वयंसेवक आहे म्हणूनच भाजप असेल, ,किंवा इतरही माझ्या कार्यात संघ संस्कारातूनच शिस्त व नियोजनबध्द कार्य करण्याची संधी मला मिळाली या सर्व माझ्या प्रवासात सर्व जेष्ठ स्वयंसेवकांचे मला कायम मार्गदर्शन व सहकार्य लाभले तर कनिष्ठांनी मला अनमोल असे सहकार्य दिले हे यश माझे नसून सर्वांचे आहे. मला मिळालेली जबाबदारी मी निश्‍चितपणे जनकल्याणाकरीता कार्य करुन पार पाडीन असे आपल्या सत्कार उत्तराच्या भाषणात नितीन पांडे यांनी सांगितले.
या प्रसंगी व्यासपीठावर रंगनाथ कीर्तने ,देविदास चांडवडकर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमास शशिकांत भागवत, स्नेहल.भागवत, पवार सर, सुनिल नाईक, भामरे काका, ऍड.बापट,हेमंत पेंडसे, अक्षय जोशी, राजेश शर्मा, गणेश पवार, अक्षय सानप, आनंद काकडे, श्री भुधर आदी मान्यवरांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व सुत्रसंचालन रमाकांतजी मंत्री यांनी केले.