Breaking News

डिपीआयच्या कार्यकर्ता उद्योजक शिबीराचे उद्घाटन


बीड, (प्रतिनिधी):- स्मृतीशेष आत्माराम चांदणे यांच्या सातव्या स्मृतीदिनानिमित्त डेमेक्रॅटीक पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने कार्यकर्ता उद्योजक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उदघाटन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण डॉ.सचिन मडावी यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अजिंक्य चांदणे, जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी विजय चव्हाण, क्षत्रीय व्यवस्थापक महा.ग्रा.बँक. केसराळीकर, अण्णाभाऊ साठे महामंडळ वरिष्ठ लेखापाल पवार, जेष्ठ औद्योगिक प्रशिक्षक डि.व्ही.फताते, जिल्हा उद्योग केंद्र निरिक्षक पवार, उद्योजक मांगल्य ब्रिकेटिंग मांगल्य धोबी.कॉम चे रंजित सराटे, एस.एस.कॉटन मिलचे प्रमोद ताटे, ग्रामीण स्वयं रोजगार सेवा संस्था प्रशिक्षक शरद पाटोळे, एमआयडीसी सहाय्य प्रमुख बीडचे शेख आदिंची उपस्थिती होती. युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी आणि युवकांना उद्योग जगतामध्ये पाऊल टाकण्याकरिता आज शहरामध्ये डिपीआयच्यावतीने कार्यकर्ता उद्योजक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युवकांना उद्योगाविषयी तज्ञांकडून मार्गदर्शन मिळाले. अण्णाभाऊ साठे महामंडळ आणि बँका रोजगारासाठी युवकांना प्रोत्साहन देत आहेत. उद्योग महामंडळाच्या माध्यमातूनही युवकांनी उद्योग सुरु करावे असे यावेळी सांगण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील डिपीआयच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.