Breaking News

पाच हजाराची लाच घेताना उद्योग निरीक्षकास रंगेहाथ पकडले


बीड, (प्रतिनिधी)- जिल्हा उद्योग केंद्रामार्फत स्कूलबस घेण्यासाठी बीज भांडवलाची फाईल मंजूर करून बँकेकडे पाठविण्यासाठी पाच हजाराची लाच स्वीकारताना बीडच्या उद्योग केंद्रातील उद्योग निरिक्षक शरद नारायण राठोड याला बीड एसीबीने रंगेहाथ पकडले.

एका सुशिक्षित बेरोजगाराने जिल्हा उद्योग केंद्रामार्फत स्कूल बस घेण्यासाठी अर्ज केला होता. त्यासाठीची भांडवलाची फाईल मंजूर करून ती बँकेकडे पाठविण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रातील उद्योग निरिक्षक शरद राठोड याने या सुशिक्षित बेरोजगाराकडे पाच हजाराची लाच मागितली होती. याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बीड शाखेला प्राप्त झाली होती. तक्रारीची खातरजमा झाल्यानंतर बीड एसीबीने सोमवारी जिल्हा उद्योग केंद्राच्या कार्यालय परिसरात सापळा रचला आणि शरद राठोड याला पाच हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. सध्या त्याच्यावर बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक श्रीकांत परोपकारी, अपर अधीक्षक एस आर जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड शाखेचे पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील आणि त्यांच्या टीमने पार पाडली.
यापुर्वी महा व्यवस्थापकास लाच घेतांना पकडले होते.

गत वर्षीे जिल्हा उद्योग केंद्रामध्ये महा व्यवस्थापक फणसे यांना ३ हजार रूपयांची लाच घेतांना पडकण्यात आले होते. त्याचाच कित्ता राठोड यांनी गिरवला आहे. बिज भांडवालाची फाईल मंजुर करण्यासाठी पाच हजाराची लाचेची मागणी केली परंतु सुशिक्षितीत तरुणाला लाच द्यायची नव्हती यामुळे त्याने लाच लुचपत विभागाकडे यांची तक्रार केली. काल लाचेच्या मागणीची खातरजमा करण्यात आला. सापळा लावुन जिल्हा उद्योग कंेंद्रातच शरद राठोड यांना लाचेची रक्कम स्वीकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले. या आगोदर महा व्यवस्थापक लाच स्वीकारतांना पकडला होता. त्याचा कोणताच धडा जिल्हा उद्योग केंद्रातील कर्मचारी घेत नाहीत, जिल्हा उद्योग केंद्रात नसते उद्योग केल्यामुळे फणसे पाठोपाठ राठोड ही एसीबीच्या जाळ्यात अडकला.