Breaking News

कर्जत येथील वसतिगृहात मोठयाप्रमाणात गैरव्यवहार


आरपीआयच्या शिष्टमंडळाकडून समाजकल्याण आयुक्तांची भेट घेत मांडली व्यथा 

कर्जत : तालुक्यातील विविध वसतिगृहातील कामकाजाबाबत आरपीआयच्या शिष्टमंडळाने सोमवारी समाजकल्याणचे आयुक्त यांची भेट घेऊन व्यथा मांडली व यामध्ये आठ दिवसात बदल न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा भास्कर भैलूमे यांना दिला. कर्जत येथील सामाजिक न्याय विभागाची निवासी शाळा असून याशिवाय मुलांचे व मुलींचे वसतिगृह आहेत. येथे मोठ्या प्रमाणात अनु. जाती व नवबौध्द मुले असून त्याचे साठी शासन लाखो रुपये खर्च करत असताना येथे अनेक व्यवस्था मध्ये गैर प्रकार होताना आढळून येत असल्याबाबत कर्जत येथील आरपीआय सातत्याने या विरुद्ध आवाज उठवत असताना शासकीय अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करत आहेत म्हणून या सर्व गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी दि 22 ऑक्टो पासून विविध प्रकारचे आंदोलने करण्याचा ईशारा निवेदना द्वारे देण्यात आला आहे. 

या निवेदनात गम्भीर आरोप करण्यात आले असून येथे मुलांना भोजन चांगले मिळत नाही असे म्हटले असून दि 11 ऑक्टो रोजी या निवाशी वस्तीग्रूहात आरपीआय ने आंदोलन करून यावर पुन्हा प्रकाश टाकला होता मात्र तरीही यात कोणताही फरक पडत नसल्यामुळे दि 22 ऑक्टो रोजी चांगल्या भोजनासाठी भीक मांगो आंदोलन केले जाणार आहे. दि 23 ऑक्टो रोजी तहसीलदार कार्यालया समोर डफडे बजाव आंदोलन दि 24 ऑक्टो रोजी छ. शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको तर दि 25 ऑक्टो रोजी पुण्यातील समाज कल्याण आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याबाबत म्हटले आहे. हे निवेदन आज पुणे येथील समाजकल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर यांना देण्यात आले. यावेळी त्यांनी नगर येथील समाज कल्याण सह आयुक्त वाबळे यांचे कडे दूरध्वनी वरून चौकशी केली असता येथील तक्रारी खर्‍या असल्याचे मान्य केले व याकडे आपण गाम्भीर्याने लक्ष देऊ असे आश्‍वासन दिले. यावेळी आरपीआयच्या शिष्टमंडळात पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष आशिष गांगुर्डे, पुणे शहर अध्यक्ष महेंद्र कांबळे, धम्मसेवक नितीन शेलार, शशीकांत मोरे, प्रवीण येवले, रमेश तेलवडे, शांतीनाथ चव्हाण, नाना कांबळे, शाम सदाफुले, सुधाकर राऊत, अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष भास्कर भैलूमे, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता कदम, धीरज पवार आदी सहभागी होते.