Breaking News

भाजी मंडईत जनावरे चोरणार्‍यांचा धुमाकूळ; एकाच रात्री पाच जनावरे गायब


बीड, (प्रतिनिधी):- शेतकर्‍याचं पशुधन लुटणार्‍या टोळ्या वाढत असतांना बीडच्या भाजीमंडई परिसरात जनावरे चोरणारांचा धुमाकूळ सुरु असुन मंगळवारी पहाटेच्या अंधारात चोरट्यांनी पाच जनावरे गायब केले आहेत.पशुपालन हा शेतील पुरक व्यवसाय मानला जात असतांना खेड्यापाड्यातून शेतकर्‍याचं पशुधन लुटण्याच्या घटना वाढल्या आहेत. असे असतांनाच मंगळवारी पहाटे बीडच्या भाजीमंडई भागातून पाच जनावरे गायब झाले आहेत. मंडईमध्ये भाजी विक्रेत्यांच्या शिल्लक राहिलेल्या भाज्या आणि खराब झालेली फळे खाण्यात येणारे जनावरे भाजीमंडईतच बसतात याचाच फायदा चोरटे उचलत आहेत व जनावरे चोरुन ते कत्तल करण्यासाठी विकले जात आहेत. त्यामुळे जनावरे चोरणार्‍या चोरट्यांना शोधुन त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.