Breaking News

रोड रोमियोंना दामिनी पथकाने चोपले


माजलगाव, (प्रतिनिधी):-येथील बीड रोड परिसरात भर रस्त्यावर हुल्लडबाजी करणार्‍या चार तरुणांना महिला छेडछाडविरोधी दामिनी पथकाने मंगळवारी रस्त्यावर चोप दिला.

महिला व मुलींच्या छेडछाडीच्या घटनांना आवर घालण्यासाठी जिल्ह्यात कार्यरत असलेले दामिनी पथक मंगळवार रोजी माजलगाव येथे आले असता, येथील बीड रोड परिसरात चार तरुण मुले रस्त्यावर हुल्लडबाजी करताना पथकाच्या निदर्शनास आले. यावेळी संबंधित मुलांना पथकाने ताब्यात घेऊन चांगलाच हिसका दाखवला. व योग्य ती समज देऊन नंतर त्यांना सोडून दिले.त्यामुळे दामिनीच्या या दणक्याने हुल्लडबाज तरुणांना चांगलाच धसका बसला असल्यामुळे छेडछाडीच्या घटना यामुळे नियंत्रणात येण्याची शक्यता दिसून येत आहे. पोलीस अधीक्षक जी श्रीधर, व डी वाय एस पी भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली या दामिनी पथकात पो.उपनिरीक्षक बी.ए. माने, एस. एस. गरजे. पोना, आर. जी. सांगळे महिला पोलीसनाईक, एस.एम. शिंदे महिला पोलीस शिपाई, आर.सी. भालेराव महिला पोलीसनाईक, ई.पोलीस कर्मचारी यावेळी कर्तव्यावर होते.