Breaking News

‘स्वर्ग रथ’ शववाहिनेच्या उपक्रमाचे अनेकांनी केले कौतूक


सोनई प्रतिनिधी

येथील यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या प्रेरणेतून सामाजिक बांधिलकी म्हणून सोनई वाहन मेळाव्याचे संस्थापक दादा वाघ यांनी तयार हाती घेतलेल्या ‘स्वर्ग रथ’ या शववाहिनेच्या उपक्रमाचे येथील अनेकांनी कौतूक केले. 

सोनई आणि पंक्रोशीतील स्व. दगडू वाघ, स्व. सखाराम वाघ, स्व. रामेश्वर दायमा, स्व. रुक्मिणी वाघ, स्व. शिवाजी दरदले आणि स्व. रामकुवर बाई दायमा यांच्या स्मरणार्थ वाघ यांनी हा उपक्रम हाती घेतला. या ‘स्वर्गरथा’चे .रामराव गडाख यांच्या हस्ते नुकतेच लोकार्पण करण्यात आले. यावेळी जालिंदर येळवंडे, प्रा. शिंदे, अशोक साळवे, शिवा बाफना, दादासाहेब दरंदले, अरुण दरदले आदींनी शुभेच्छा दिल्या.