Breaking News

जातेगावात रोहित्र जाळल्याने तीन एकर ऊस खाक; लाखोंचे नुकसान


गेवराई :(प्रतिनिधी)-: बुधवारी दुपारी गेवराई तालुक्यातील जातेगाव सर्कल मधील ठा.आडगाव येथील लक्ष्मण किसन कोकाट यांच्या शेतातील रोहित्र अचानक जळाले. शेतातच रोहित्र असल्याने परिसरातील तीन एकर ऊस जळून खाक झाला. ही घटना बुधवारी घडली. यामध्ये शेतकर्‍याचे लाखो रूपयांचे नुकसान झाले असून तो आर्थिक संकटात सापडला आहे.

लक्ष्मण किसन कोकाट यांची प्रगतशील शेतकरी म्हणुन ओळख आहे. गट नं. २४६/४७ मध्ये त्यांची शेती आहे. यामध्ये त्यांनी तीन एकर ऊस लावलेला आहे. याच उसाच्या शेतात रोहित्र आहे. बुधवारी हे रोहित्र अचानक जळाले. त्याच्या ठिणग्या दुरवर उडाल्याने परिसरातील जवळपास तीन एकर ऊस जळून खाक झाला. आगोदरच दुष्काळ त्यात हे संकट ओढावल्याने कोकाट आर्थिक संकटात सापडले आहेत.